निवांत असे ते क्षण पुन्हा परतावे क्षणोक्षणी!
नको ती स्पर्धा, नको ती इर्षा,
नको उगाचच ती चिंता,
जळमटे सारी दूर करून, आयुष्याच्या बेटावर निःशब्द मनाला स्वतःतच शोधत राहावे,
माती बाजूला सारत,
उगवून येताना अन् गळून पडताना
अगदी अविचल......अलिप्त.....असावे,
इंद्रधनुष्याच्या सप्तरंगात,
बेधुंद त्या मनाला आकाशात समेटून द्यावे!
निवांत...
निर्जन अश्या या रस्त्यावरती ...लपतछपत,,
शब्दांशीच हितगुज साधत..,
मावळत्या सूर्याला अन् अश्रूंना वाट मोकळी करत,
सांज समयी अंधार भोवती, झुळझुळ त्या वाऱ्यात,
क्षण दचकावे....क्षण हरखावे....
अन् पुन्हा नवेपण मनास यावे!!
~Prajakta N
Nice lines...👍
ReplyDelete🤗🤗
ReplyDelete